मला आजून ही आठवतंय...
आपण चोरून चोरून भेटायचो...
चार चौघात मात्र आपण...
अनोळखी पणाने वागायचो...
मला अजून ही आठवतंय...
मी तुला एक पत्र दिलं होता..कोणी तरी बघेन तुझ्या कडे..
अस म्हणत तू ते परत केला होतास..त्याचा अर्थ मी तुझ्या नाकरातच मोडला होता...
मात्र त्या पत्रा सोबत एक पत्र अजून होत....ज्यात तुझ्या होकाराच्या शब्दांची सुरेख गुंफण होती...
आठवतंय...? मी लिहिलेली प्रत्येक कविता...सर्वांच्या आधी तूच वचायचीस...
"कशी आहे..?" असा मी विचारल की..माझ्या खांद्यावर अलगद डोकं ठेवायचीस...
ती कविता तुझ्या हृदया पर्यंत पोहोचायची..आणि त्याच्या सखोलतेची मला एक वेगळीच जाणीव द्यायची...
मला आठवतय आपण शेवटचे भेटलो ते..
तुझ बोलन थांबल होत , पण डोळे बोलत होते...
माझ्या पासून तू दूर जाणार .पण मी नेहमी तुझ्या मनात राहणार ...हे न बोलता सांगत होते...
मी सुद्धा शांतच होतो..
प्रत्येक जात्या क्षणात तुझा चेहरा तुझ हसू...तुझ मझ्यावर रागावन..आणि क्षणातच माझ्या भोवती मिठी आवळणे...
मनात खोलवर साठवून घेत होतो..
मी नही विसरू शकणार..जाताना ,
तू शेवटच्या वळणा पर्यंत सारखी मलाच न्याहाळत होतीस..
तुला जाताना बघताना मी .शांत होतो स्तब्ध होतो...
तुझ प्रत्येक पाउल तुला माझ्या पासून दूर नेणार होत..
आता तू पुन्हा कधीच दिसणार नाहीस...ठाऊक होत...!!!
पण तू उद्या पुन्हा भेटशील,,त्याच वडाच्या गर्द छायेत...जिथे आपण आयुष्य एकत्र घालविण्याचे स्वप्ना सजविले होते..
का ठाऊक..!! मनाला उगीचच वाटत होत...
पण तुझ प्रत्येक पाउल तुला माझ्या पसून दूर नेणार होत...दूर...दूर नेत होत...
कधी हि परत न येणारी पाउल...आणि मग खात्री झाली...
मनात प्रचंड वादळ दाटून आल...आसवांच्या सारी कोसळून वाहिल्या...
आणि त्यत भीजून कोमेजलेल्या आपल्या स्वप्नांच्या फक्त पाऊलखुणा तेवढ्या राहिल्या...
कधी हि पूर्ण न होऊ शकलेल्या स्वप्नांच्या..अस्पष्ट...पाऊलखुणा...
मला आताही आठवतय....!!
मी आता हि त्याच झाडाखाली आहे...आज हि पाउस तसाच आहे...कोसळणारा...बाहेर हि...आणि मनात हि ...................
................***प्रारब्ध***.......